
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
पिंपळदरी :- लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथील मोहरम म्हणजे एकतेचे प्रतिक आहे. सर्वधर्मसमभाव बघायला असेल तर पिंपळदरी च्या मोहरमाला अवश्य भेट देऊन अनूभव घेऊ शकता.येथे मुस्लिम समाजातील फक्त दोन चार घरे आहेत. पण मराठा समाजाचे व मुस्लिम समाजाचे मिळून मोहरम मोठ्या थाटात साजरा केला जातो. अग्निकुंडातून डोला घेऊन खवखवत्या विस्तवावरून चालत जातात कोणालाही कसल्याही प्रकारची इजा किंवा पोळत नाही. पुर्वी पासून चालत आलेली परंपरा एकात्मतेचे प्रतिक मोहरम बारामन यांच्या नावाने आजतागायत चालू आहे. हिंदू मुस्लिम बांधवांनी एकीने कसे रहावे याची शिकवण पिंपळदरी येथील मोहरम मधुन मिळते. आपण सारे भारतीय आहोत आणि भारत आपली माता आहे. हिच शिकवण मिळते.