
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – प्रा. अंगद कांबळे
दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी म्हसळा आदिवासी वाडी येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजातील क्रांतिकारक बिरसा मुंडा, रायगड जिल्ह्यातील आदिवासी क्रांतिकारक नाग्या कातकरी, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी व तालुक्यातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात सदर गावातील शालेय विद्यार्थ्यांना रायगड जिल्ह्यातील आदिवासी कर्मचारी वर्गातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे समाजसेवक अध्यक्ष श्री. यशवंत पवार हे होते.
वक्ते म्हणून श्री.तडवी सर, श्री.प्रवीण लहारे सर, श्री.संजय वसावे सर, डॉ. प्रकाश बुलबूले, श्री. सोनावले सर
आदी मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या कला, संस्कृती, हक्क उत्सव व आदिवासी समाज हा जल, जंगल व जमिनीचा रक्षण करणारा समाज म्हणून संपुर्ण जगात ओळख आहे आणि आदिवासी समाज हा निसर्गपुजक म्हणून ओळखला जातो. असे मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त करुन जागृत करण्यात आले. सुत्रसंचालन श्री. नामदेव पवार यांनी केले व आभार श्री.महेंद्र गायकवाड यांनी केले.