
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात ‘आझादी गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे.
या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून येथून या आझादी गौरव यात्रेला सुरुवात झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, , माजी मंत्री सुनिल केदार यांच्यासह मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ही यात्रा राज्यातील प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. 14 ऑगस्टला या यात्रेचा समारोप होणार आहे.
दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसची आझादी गौरव यात्रा जाणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, तालुका स्तरावरून 75 किलोमीटर पर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेद्वारे काँग्रेसची विचारधारा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून केंद्रातील भाजप सरकारकडून होत असलेल्या सुडाचे राजकारणाबद्दल भूमिका मांडली जाणार आहे. केंद्र सरकारकडून जीवनावश्यक वस्तुंवर कर लावून महागाईची भेट भाजपकडून दिली जात आहे. महागाई असो की भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस असो की इतर विरोधी पक्षांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास त्यंच्याविरोधात ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा गैरवापर करून दहशत निर्माण केली जात आहे. संविधानच धोक्यात आले असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.