
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सोलापूर : जोपर्यंत शेतकऱ्यांच्या उसाची बिलं दिली जात नाहीत तोपर्यंत तानाजी सावंतांना
जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे पदाधिकारी शरद कोळी यांनी कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत आणि आमदार शहाजी बापू पाटील यांना खुले आव्हान दिले आहे.
त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेल्या शरद कोळी यांनी नुकताच नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्री तानाजी सावंत आणि आमदार शहाजी बापू पाटील यांना आव्हान देण्यात आले आहे. या त्यांच्या आव्हानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिलं देण्यात आली नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी शरद कोळी यांनी तानाजी सावंत यांना पाय ठेऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी असलेले शरद कोळी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे मात्र याच तानाजी सावंतानी शेतकऱ्यांना बारा बैलाचा चावऱ्या नांगर लावलाय अशी जहरी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.