
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवि दिल्ली : न्यायमूर्ती यू यू लळीत हे देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. भारताचे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे.
लळीतहे देशाचे 49 वे सरन्यायाधीश असणार आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी देशाच्या पुढील सरन्यायाधीशासाठी न्यायमूर्ती यूयू लळीत यांच्या नावाची शिफारस कायदा मंत्रालयाकडे केली होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे तसेच त्यांच्या नियुक्ती आदेशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. न्यायमूर्ती लळीत 27 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. निवर्तमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमण एक दिवस अगोदर 26 ऑगस्टला निवृत्त होणार आहेत.
कायदा मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले की, “राज्यघटनेच्या कलम 124 च्या कलम II च्या तरतुदींनुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय उमेश लळीत यांची भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करत असतात तसेच त्यांची नियुक्ती 27 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल.
===================
न्यायमूर्ती लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षा कमी असेल तसेच 8 नोव्हेंबर रोजी ते वयाच्या 65 व्या वर्षी निवृत्त होणार आहेत.
==============