
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरात हर घर तिरंगा अभियानाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असुन लोहा न.पा.ने केले उत्कृष्ट नियोजन.
भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमा अंतर्गत भारत सरकारच्या आदेशानुसार तिरंगा म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. देशभक्ती जागृत करण्यासाठी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत असल्यामुळे व भारत सरकारच्या वतीने संपूर्ण देशभर दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हे देशव्यापी अभियान राबविण्यात येत असून यांची लोहा शहरात जनजागृती करण्यासाठी लोहा न.पा.च्या वतीने मोठा पुढाकार घेतला आहे . लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी परिश्रम घेऊन सर्व सन्माननीय नगरसेवक, कर्मचारी, शाळा, महाविद्यालय यांच्याशी समन्वय साधून लोहा शहरातील अनेक नागरिक व सर्व शाळांना आपल्या देशाचे राष्ट्रध्वज असलेल्या तिरंगा झेंडयाचे वाटप केले.
आज लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज,कै. विश्वनाथराव नळगे, जि.प. हा. श्री छत्रपती विद्यालय , डॉ. याकूबखान उर्दू शाळेसह शहरातील सर्व शाळेनी एकत्रीत येऊन ३७५ फुट लांबीच्या राष्ट्रध्वज तिरंगा ध्वज घेऊन दोन कि. मी. ची रॅली काढली भारत माता की जय अशा नाऱ्याने लोहा शहर दुमदमले.
तसेच यावेळी हजारो विद्यार्थ्यांना लोहा न.पा. च्या वतीने विविध बिस्किटे खाऊ म्हणून वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक शरद पाटील पवार, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, नगरसेवक नबी साब शेख, नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक केतन खिल्लारे, नगरसेवक जीवन पाटील चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड , यांच्या सह सर्व कर्मचारी, उपस्थित होते.
तसेच लोहा न.पा.ने लोहा शहरातील नागरिकांना आवाहन केलें होतें की, शहरातील सर्व नागरिकांनी हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावा तेव्हा लोहा शहरातील सर्वच वाॅडातील या अभियानात सहभाग नोंदवून त्यांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविला आहे.