
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड – गोविंद पवार
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार, माजी खासदार डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकोत्सव वर्षा निमित्त संस्थेतील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना निकालानंतर दिलेल्या शब्दा प्रमाणे प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनी प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य करून दिलेला शब्द पूर्ण केला.
यामध्ये श्री संत गाडगे महाराज उ.मा. विद्यालयातील मराठी विषयात राज्यात प्रथम आलेली कु .समृद्धी संतोष जाधव (एक लक्ष रुपये) व श्री शिवाजी कॉलेज,कंधार येथील कु.गऊळकर शुभांगी बापूराव (पन्नास हजार रु.)कु.गऊळकर शिवानी चंद्रकांतराव (पन्नास हजार रु.) व या बरोबरच संस्थेचे हित चिंतक मुखेड येथील गरूडकर परिवारातील भगिनी ज्योती किशोर गरूडकर यांच्या परिवारातील सदस्य कॅन्सर सारख्या आजाराने त्रस्त असल्यामुळे त्यांच्या इलाजासाठी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी तर्फे एक लक्ष रु.देऊन सहाय्य करण्यात आले.डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकोत्सव वर्षा निमित्त संस्थेतील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना परिक्षेच्या निकालानंतर दिलेल्या शब्दा प्रमाणे पुढील शिक्षणाच्या जबाबदारीची जाण ठेऊन विद्यार्थ्यांच्या गरजेप्रमाणे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी तर्फे अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनी प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य करून दिलेला शब्द पूर्ण केल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यावेळी प्राचार्य डॉ.अशोकराव गवते,प्राचार्य पगडे , श्री संत गाडगे महाराज उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप बोधगिरे, उपमुख्याध्यापक अनिल जाधव, पर्यवेक्षक बी.डी. जाधव,उपप्राचार्य अमरसिंह दापके,अमोल पाटील ढगे,प्रा. बबन पवार,प्रा.गजानन जामगे उपस्थित होते.