
‘या’ वस्तूंना खरेदीदार मिळेना; ट्रम्प चिंतेत…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर कर लादला आहे, मात्र हा निर्णय अमेरिकेसाठी चिंताजनक ठरत आहे. कारण आता अमेरिकन मका आणि सोयाबीनसाठी खरेदीदार मिळणे कठीण झाले आहे.
टॅरिफच्या निर्णयामुळे चीन, रशिया, ब्राझील आणि भारताने कठोर भूमिका घेत व्यापाराबाबत कडक निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील सोयाबीन पीक आता तयार झाले असून त्याची काढणी सुरु होणार आहे. मात्र आता सोयाबीन विकायचे कुठे असा प्रश्न अमेरिकेला पडला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेने टॅरिफ लावल्यानंतर चीनने अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी करणे बंद केले आहे. चीन आता ब्राझील आणि अर्जेंटिनामधून सोयाबीन खरेदी करत आहे. अमेरिकेने 2024 मध्ये 24.5 अब्ज डॉलर्स किमतीचे सोयाबीन निर्यात केले होते, त्यातील 50 टक्के म्हणजे 12.5 अब्ज डॉलर्सचे सोयाबीन एकट्या टीनने खरेदी केले होते. मात्र आता चीनने सोयाबीनची खरेदी बंद केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.
भारत अमेरिकेतील संकरित मका आणि सोयाबीन खरेदी करत नाही. तसेच अमेरिकेने यावर 60 टक्के टॅरिफ लादलेला आहे. त्यामुळे भारत भारत सोयाबीन, सोया तेल आणि कृषी संबंधिक पदार्थ अर्जेंटिना, ब्राझील आणि युक्रेनकडून खरेदी करत आहे. भारत आमच्याकडून मका खरेदी करत नाही अशी तक्रारही एका अमेरिकन मंत्र्याने केली होती.
अमेरिकेन उत्पादनांना खरेदीदार मिळणार नाही
चीनच्या या निर्णयामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. भारतीय वकील आणि लेखक नवरूप सिंग यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी, ‘भारत आणि चीन अमेरिकन सोयाबीनवरील त्यांच्या भूमिकेवर कायम राहिले तर कोणीही अमेरिकन मका आणि सोयाबीन खरेदी करणार नाही. जर ट्रम्प यांनी टॅरिफचा बोजा वाढवत राहिले तर इतरही अमेरिकन उत्पादनांना खरेदीदार मिळणार नाही. असे झाल्यास ट्रम्प यांना त्यांच्याच शेतकऱ्यांकडून विरोध होईल, कारण याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे.
टॅरिफच्या निर्णयाचा अमेरिकेला फटका
अमेरिकन सिनेट नेते जॉन थुन यांनी टॅरिफच्या निर्णयाचा अमेरिकेला फटका बसत असल्याते कबूल केले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत महागाई वाढली आहे आणि अमेरिकन उत्पादनांना कमी खरेदीदार मिळत आहेत. ट्रम्पच्या टॅरिफला उत्तर म्हणून चीनने अमेरिकेवर 34 टक्के टॅरिफ लादला आहे, तसेच सोयाबीन खरेदी थांबवली आहे. तसेच भारत, ब्राझील आणि रशियानेही अमेरिकेविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.