
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – प्रा अंगद कांबळे
पवार परिवार यांच्या वतीने लक्ष्मण पवार स्मृती पुरस्कार2022
अमृत महोत्व 75 स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मंदाटने ता. म्हसळा येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत पवार, प्रदीप पवार, मोहन पवार परिवार यांच्या वतीने गेल्या वर्षी आकास्मात निधन झालेले मांदाटणे ग्रुप ग्रामपंचायत चे माजी उप सरपंच, पंचक्रोशी तील शिक्षण प्रेमी लक्ष्मण धोंडू पवार यांच्या स्मरणार्थ या वर्षी पासून पवार परिवार यांच्या वतीने *लक्ष्मण पवार स्मृती पुरस्कार 2022*माध्यमिक शाळा पाष्टी या शाळेतून 10 वी परीक्षेत प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्याना लक्ष्मण पवार स्मृती पुरस्कार देण्यात आले.
. कु. सोनम किरण धुमाळ, सिमरन संतोष दिवेकर, रसिक मधुकर धोकटे यांना या वर्षीचे पुरस्कार देण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, संविधान विषयी चे पुस्तकं आणि रोख रक्कम अनुक्रमे 5000, 3000, 2000 असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
हे पुरस्कार वितरन करण्यासाठी म्हसळा तहसीलदार समीर घारे, गट विकास अधिकारी पोळ साहेब, पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे साहेब, गट शिक्षण अधिकारी डॉ. संतोष दौड, विस्तार अधिकारी दिघीकर साहेब, कृषी अधिकारी साले साहेब. आवर्जून उपस्थित होते तर कार्यक्रम अध्यक्ष स्थानी माजी जि प सभापती बबन मनवे हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनयकुमार सोनवणे सर यांनी केले या वेळी तहसीलदार समीर घारे साहेब यांच्या मातोश्री यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाला श्रीपत सेठ मनवे, पत्रकार बांबूं शिर्के, पत्रकार अंगद कांबळे, महेश घोले, रक्षित सामाजिक संस्थेचे शशिकांत पवार, प्रा. कानिफ भोसले, सुदाम माळी, प्रफुल पाटील, बिलाल शिकलगार, शंकर गोरिवले, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंचक्रोशी तील सिविल इंजिनिअर ची पदवी मिळवणारा हर्षद मुंडे याचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे आज सकाळी ग्रुप ग्रामपंचायत मांदाटणे येथील ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वज PNP पाष्टी शाळेतून 90.60 टक्के गुण मिळवणारी विद्यार्थिनी सोनम धुमाळ हिच्या हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले.
असे कार्यक्रम विद्यार्थ्याना प्रेरणा देण्यासाठी खूप प्रभावी ठरतात अशी भावना सर्व उपस्थित मान्यवर यांनी व्यक्त केली