
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी
एसटी आगरांचे वाहतूक नियंत्रण प्रमुख अधिकारी सागर पळसुले यांची अकोला आगरांमध्ये बदली झाली असुन. श्री सागर पडसुळे यांनी सातारा एसटी आगरांमध्ये गेले चार वर्षाच्या कालावधीमध्ये गाव तिथे एसटी असे अनेक उपक्रम, तसेच आषाढी पंढरपूर यात्रा श्री.गणेश दर्शन गणपतीपुळे अशा विविध मार्गावर जादा बसेसचे नियोजन त्यांनी सातारा जिल्ह्यांमध्ये केले. सागर पळसुळे यांचे अकोला एसटी आगरांमध्ये त्यांची बदली झाली तर त्यांच्या जागी सातारा जिल्ह्यांतीलच सुपुत्र आणि कराड तालुक्यांतील असुन वाहतूक नियंत्रण अधिकारी म्हणून रोहन भानदास पलंगे यांची नियुक्ती करण्यांत आली. रोहन पलंगे हे २०११ मधील अधिकारी असून त्यांनी आतापर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतूक नियंत्रण प्रमुख म्हणून उत्कृंष्ट अशी आपली जबाबदारी आणि याशिवाय प्रवाशांच्या अनेक प्रश्नांना ते नेहमी स्वता पुढाकार घेत होते. त्यांच्या माध्यमांतून त्यांनी गाव तिथे एसटी असे विविध जिल्ह्यांमध्ये उपक्रम राबवून आपली त्यांनी कारकीर्द गाजवली रोहन पलंगे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचे एसटी खात्यांमध्ये चांगलीच ओळख आहे. रोहन पलंगे हे सातारा जिल्ह्यांचे सुपुत्र असल्यांने त्यांना जिल्हा विषयी चांगलीच माहिती आहे.