
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम – शुक्रवारी शहरातील कपिला दूध डेअरी च्या प्रांगणात गोकुळाष्टमी निमित्त साहिल गाढवे मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मा.नगराध्यक्ष संजय गाढवे व पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे यांच्या हस्ते श्री कृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून दहीहंडी उत्सवाची सुरुवात करण्यात आली.शहरात मागील वर्षी पासून साहिल गाढवे मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जात आहे.या दहीहंडी उत्सवात शहरातील कसबा प्रतिष्ठान,जिजाऊ नगर,रामहारी नगर,गुरुदेव दत्त हायस्कूल क्लब व थ्री एस अकॅडमी या गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता.तालुक्यातील एकमेव ठिकाणी हा उत्सव साजरा होत असल्याने यावेळी शहरासह तालुक्यातील तरुणांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी तरुणांना मार्गदर्शन करताना मा.नगराध्यक्ष संजय गाढवे म्हणाले की,मागील वर्षी पेक्षा या वर्षी दहीहंडी उत्सवास चांगला प्रतिसाद मिळाला असून या पुढील काळात मोठ्या शहरांप्रमाणे भूम शहरातील देखील दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल.पुढील काळात शहरासह तालुक्यातील गोविंदा पथकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संजय गाढवे यांनी केले.यावेळी कसबा प्रतिष्ठान ढोल पथक हे मुख्य आकर्षण ठरले.थ्री एस अकॅडमी गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला तर गुरुदेव दत्त हायस्कूल क्लब गोविंदा पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला. मा.नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या गोविंदा पथकास पाच हजार रुपये तर द्वितीय क्रमांकाच्या पथकास दोन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांकडून महा प्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत तवार, आलमप्रभू शहर विकास आघाडीचे अध्यक्ष संजय साबळे,सचिव सुरज गाढवे,बाळासाहेब अंधारे, मा.नगरसेवक सुमित तेलंग,अश्रुबा नाईकवाडी,किरण जाधव,संजय पवार,धनंजय मस्कर,चांगदेव शेंडगे,सतीश माळी,सुनील माळी,मुशिर शेख,दिपक गाढवे,दत्ता गाढवे,महेश गपाट,वैभव सस्ते यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी साहिल गाढवे मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.