
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
मानव विकास योजने अंतर्गत माणिक माध्यमिक विद्यालय , तोंटबा ता. किनवट येथे इयत्ता ८वी च्या विद्यार्थीनींना एकूण १४ सायकलींचे वाटप संस्थेचे सचिव श्री. उद्धवराव बस्वदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालक मारोती जाधव, संदिप राठोड, रवि राठोड, राजू पवार, मुकूंद राठोड, रावसाहेब कदम व शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती वाघ जे.व्ही. सहशिक्षक श्री.कुंडगिर एस.जी. श्री. मुनेश्वर के.बी. श्रीमती गांजेगीवार एस.आर.श्रीमती काकडे के.एस. श्री.कांबळे बी.एम. श्री.ताटे एस.ए.श्री.राठोड बी.टी.श्रीमती वाघमारे एस.व्ही. श्री.राठोड ए.एम. शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. लाभार्थी विद्यार्थीनी वैशाली संतोष राठोड , राजनंदनी विनोद राठोड सुषमा राहू राठोड, बाली संजू पवार, स्वाती राजू पवार अंताक्षरी इंदल राठोड सुवासिनी दशरथ राठोड, प्रियंका संतोष, राठोड ,जयश्री मांगीलाल राठोड, पायल रोहीदास राठोड, नंदिनी मारोती जाधव, श्वेता विनोद जाधव , रेश्मा दत्ता राठोड, सुषमा दत्ता राठोड इत्यादी विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.