
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा- गुणाजी मोरे
पुणे :आम आदमी पार्टी फुरसुंगी इच्छुक उमेदवारां कडून काल गंगानगर, फुरसुंगी येथे मोफत नेत्र तपासणी व चस्मे वाटप शिबिर मोठ्या उत्साहात घेण्यात आले.
यासाठी शिबिराच्या ४-५ दिवस अगोदर बॅनर व रिक्षा वरती दवंडी च्या माध्यमातून जागृती करण्यासाठी आली होती.
या शिबिरामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नोंदवला गेला सहभाग नोंदवला . त्याचबरोबर समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व चस्मे वाटप शिबिर सोहळ्याचे अभिनंदन करण्यात आले. शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात चष्म्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टी फुरसुंगी येथील इच्छुक उमेदवार, पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सेवा देणारे डॉक्टर कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आला.