
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
===================
नऊ वर्षाच्या तिसरीत शिकणाऱ्या इंद्र मेघवाल या दलित विद्यार्थ्यांने मटक्यातील पाणी पिल्याने उच्च जातीय शिक्षकाने अमानुष मारहाण केली 20 दिवसाच्या उपचारादरम्यान त्याला जीव गमवावा लागला त्याला न्याय मिळावा यासाठी दलित जनतेने प्रचंड आक्रोश केला परंतु मुख्यमंत्री अशोक गेहलोत सदर प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. अखेर बसपा भीम आर्मी भिमसेना मेघवाल समाजाच्या सर्व संघटना भारतीय दलित कोब्रा यांनी 18 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासून जालोर येथे बेमुदत धरणे आंदोलन चालू केले 36 तासानंतर या लढायला यश आले समाजाच्या खालील मागण्या संदर्भात सरकारला घोषणा करावी लागली
१ ) संपूर्ण प्रकरणाच्या निष्पक्ष तपास होण्यासाठी एसआयटीचे गटन करण्यात आले
2 ) मूर्त इंद्र मेघवाल त्याच्या पिडित कुटुंबीयांना राजस्थान सरकार व काँग्रेस यांच्यावतीने 35 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली व त्याच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली
३ ) ज्या शाळे मध्ये सदर प्रकार घडला त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली
4 ) सदर खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात येण्याची घोषणा करण्यात आली .
सदर न्याय मिळण्याच्या आंदोलनात सहभागी झालेले सर्व संघटना सर्व दलित व आंबेडकरी जनता हिचे इंद्रा मेघवाल न्याय समिती चा निमंत्रक म्हणून आभार मानण्यात येत आहे .
जातीयतेच्या विरोधामध्ये आमचा लढा कायमच राहील राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी इंद्र मेघवाल यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी अशी मागणी आंबेडकरी जनता व भारतीय दलित कोब्रा च्या वतीने करण्यात येते.
संस्थापक अध्यक्ष पुणे शहर एडवोकेट भाई विवेक चव्हाण
भारतीय दलित कोब्रा