
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नांदेड दि.23 : जूना मोंढा येथे अंतिम हिंदु सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा अर्धाकृती पुतळा उभरावे या साठी आज राजपूत टास्क फोर्स यां सामाजिक संघटने च्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांच्या सह आयुक्त, महापौर, विरोधी पक्ष नेता यांना निवेदन देण्यात आले. नांदेड चा इतिहासात गाडीपुरा वर्षानुवर्ष संस्कृतीक व ऐतिहासिक धरोहर राहिला आहे.जेथे रावण धहन, महापुरुष जयंती,रामनवमी, रथ यात्रा,अशा एक ना अनेक सामाजिक संस्कृतीक कार्यक्रम केले जातात.राजपूत समाज व हिंदु समाज गाडीपुऱ्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात शतका नुशतके राहत आलेला आहे.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाडीपुरा हा राजपूत समाजाचा गड म्हणूनमानला जातो.नांदेड शहराचा मानबिंदू. संपूर्ण महाराष्ट्र व भारतातून राजपूत समाजाचे लोक विविध कारणाने गाडीपुरा नांदेड शहारास भेट देतात.” हा राजपूत समाजाचा गढ असून हजारो राजपूत परिवार वर्षानुवर्षं राहत असूनही एकही राजपूत समाजाच्या महापुरुषा ची प्रतिमा ही यां भागात दिसून येत नाही. ही सलग नाराजगी आज संपूर्ण राजपूत समाज मध्ये दिसून येत आहे ” असे आपल्या निवेदनात म्हटले आहे.दरम्यान आज राजपूत टास्क फोर्स ने अंतिम सम्राट प्रथ्वीराज चौहान यांचा अर्धकृती पुतळा जुना मोंढा टॉवर येते बसविण्यात यावे यासाठी आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समवेत मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, महापौर जयश्री पावडे, विरोधी पक्ष नेता दिपकसिहं रावत यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.महापौर यांनी त्यास मंजुरी द्यावे ” असे समाज बांधवान कडून विनंती पर केले आहे. यावेळी राजपूत टास्क फोर्स यांच्या सह विविध संघटने चे पदाधिकारी,राजपूत समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.