
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
उस्मानाबाद:- शहरात राष्ट्रीय नाभिक महासंघ जिल्हा उस्मानाबाद यांच्या वतीने श्रीसंत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम नरहरी महाराज मंदिर तांबरी विभाग उस्मानाबाद या ठिकाणी संपन्न झाला. सदर कार्यक्रमात सकाळी 8.00 ते 12 या वेळेत ह.भ.प.राजेंद्र ताटे महाराज यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी बारा वाजता गुलाल उधळण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर महाआरती,भजन गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर शहरातील बांधवांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष मा.मंगलताई शिराळे, राज्य कार्यकारणी मा.लक्ष्मणरावजी धाकतोडे मा.हरिश्चंद्र गवळी, मा.बाळासाहेब मंडलिक, मा.दिलीप राऊत मा.पुरुषोत्तम माने, मा.मधुकर हुजर, प्रकाशराव शिराळे, रमेश घागरे, दिलीप गोरे, धनंजय झेंडे, सौ.वनमाला माने, सौ.शेंद्रेताई त्याच बरोबर अनेक मान्यवरांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला. सदर कार्यक्रमाच्या प्रस्ताविक मा लक्ष्मणरावजी धाकतोडे यांनी राष्ट्रीय नाभिक महासंघाची पुढील दिशा व समाजाच्या हितासाठी राबविण्यात येणार्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच गेले दोनवर्षी श्रीसंत सेनाजी महाराजांची पुण्यतिथी कार्यक्रम कोरोना संक्रमणामुळे अगदी साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर आज प्रतिर्षीप्रमाणे याहीवर्षी व्यवसाय बांधवाकडुन या कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करण्यात आलेली नाही.
यापुढे बोलताना ते म्हणाले कोरोना कालावधीमध्ये राष्ट्रीय नाभिक महासंघ उस्मानाबादच्या वतीने उस्मानाबाद शहरातील गोरगरीब नाभिक व्यवसाय बांधवांसाठी वेळोवेळी मदत करण्यात आली. किराणा व भुसार मालाच्या भरीव मदतीचा उल्लेख ही ह.भ.प. ताटे महाराज यांनी माहिती देवुन कार्यकर्त्याचे कौतुक केले.