
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- आजचे विद्यार्थी हे भविष्यातील सुशिक्षित नागरिक असून,त्यांचे आदर्शवत भवितव्य शिक्षकच घडवितात.माझा विध्यार्थी ते मुख्याध्यापक पर्यंतचा प्रवास हा मला ज्यांनी घडविले ते म्हणजे माझे आई-वडील.आमचे कुटुंब उच्चशिक्षित असल्यामुळे शिक्षक पेशा हा जणू आमच्या घराणेशाहीला लाभलेला वारसाच.आमचे वडील श्री.स्व.श्रावणजी रावळे यांनी मुख्याध्यापक पद नाकारून एक सामान्य शिक्षक म्हणून मनपा शाळा नं.१३ अमरावती येथे सेवा केली व निवृत्त झाले.त्यांनी त्याच्या कारकिर्दीत असंख्य उच्चशिक्षित विद्यार्थी घडविले.त्यानंतर त्यांनी २५ डिसेंबर २०११ ला वयाच्या ७३ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.आई श्रीमती यमुना श्रावणजी रावळे ह्या मनपा मुलींची कन्या शाळा,भाजीबाजार अमरावती येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.आईंना १९९७ साली राज्य सरकार द्वारा सावित्रीबाई फुले पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले.२००० साली त्या निवृत्त झाल्या त्यांच वय सध्या ८१ वर्षे आहे.श्री.नरेंद्र श्रा.रावळे यांनी अमरावतीत २०१० साली खो-खो महिला मंडळाची स्थापना केली.त्यांच्या मार्गदर्शनात पन्नासच्या वर विद्यार्थ्यांनी खेळात नावलौकिक मिळविले.आई-वडिलांचा आदर्श घेत मी त्यांच्या पावलावर-पाऊल टाकत आज माझी सुद्धा पदोन्नती होऊन १ ऑगस्ट २०२२ ला मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला.आई-वडिलांचे आशीर्वाद,त्यांची शिकवण आणि मला ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन दिले ते माझे शिक्षक तसेच ज्या समाजात मी जन्म घेतला व वावरलो अश्या समाजबांधव यांचे आशीर्वाद स्वरूपात मला आज फळ मिळाले.
ज्ञानाची गोष्ट असो,चांगला माणूस बनण्याची गोष्ट असो किंवा मग चांगल्या संस्कारची गोष्ट असो आपल्या आयुष्यात या गोष्टी आपल्याला आई-वडिलांपासून तर मिळतातच पण या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची व्यक्ती आपल्याला या गोष्टी शिकवत असते ती व्यक्ती म्हणजे ‘शिक्षक’.प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान देण्यासह चांगले संस्कार एक शिक्षक देत असतो.एक विद्यार्थ्याला घडवण्यामागे त्यांच्या आईवडीलांसह मोठी जबाबदारी शिक्षकावरही असते.त्यामुळे शिक्षकामध्ये शिकवण्याबरोबर आणखी बरेच गुण असणे आवश्यक आहे.ते म्हणजे उत्तम स्वास्थ्य,भावनिक स्थिरता,सारस्य आणि उत्साह,सहानुभूती,उच्च स्वर,संयम आणि सहिष्णुता,भाषा,सामाजिकता,नेतृत्व क्षमता,आणि महत्त्वाचे म्हणजे वेळेची नियमितता ह्या सर्व गोष्टी सर्व शिक्षकांनी स्वतःअंगीकारल्या पाहिजे व विद्यार्थ्यांना ह्या गुणांची शिकवण दिली पाहिजे असे प्रतिपादन श्री.नरेंद्र श्रावणजी रावळे यांनी त्यांच्या सत्कार समारंभावेळी समाज बांधवांना केले.
श्री.नरेंद्र श्रा.रावळे यांची
लोकमान्य विद्यालय,पोरगव्हाण (विष्नोरा)येथे मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी वीरशैव कंकय्या चर्मकार समाज विकास संस्था यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री.सचिनजी वाटकर जिल्हा संघटक,विशेष उपस्थिती श्री.विजय डी.सावरकर,अरूण चव्हाण,नाना सावरकर,अनंता वाटकर,नरेश घोरे,अजिंक्य सावरकर,रविंद्र उज्जैनकर,अरविंद सावरकर,धनराज नांदुरकर,धीरज अर्जापुरे,पिंटूभाऊ विजयकर,महेन्द्र सावरकर,विनोद कोठेकर,कैलाश पिढेकर,सागर वाटकर,बाल्या रावेकर,अनिल सावरकर,नरेंद्र चव्हाण,मोहन विजयकर,मोहन पिढेकर,पुरुषोत्तम गायकवाड,रोहित सावरकर व आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.