
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- कवि सरकार इंगळी
ओयासिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन वर्ल्ड रिकॉर्ड दिल्ली यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती
ओयासिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन दिल्ली च्या अध्यक्षा तथा सी ई ओ डॉ सुषमा यांनी दिली.प्रत्येक वर्षी देशभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तिची निवड करून त्यांचा इंडियन आईकॉन अवार्ड हा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो असेही त्या म्हणाल्या.
ओयासिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन
गेली 18 वर्षे शिक्षण, मनोरंजन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात जनहितासाठी आपल्या भारतभरातील विविध शाखांद्वारे कार्य करत आहे.
या संस्थेची शाखा असलेल्या ओएसिस वर्ल्ड रेकॉर्ड्सने भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य महोत्सवात 200 निवडक प्रतिनिधींना विविध श्रेणींमध्ये इंडियन आयकॉन पुरस्काराने सन्मानित केले.
भारतातील 18 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 800 स्पर्धकांनी या पुरस्कार सोहळ्यात भाग घेतला, त्यापैकी 200 प्रतिनिधींना त्यांच्या संबंधित क्षेत्रात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या सर्व देशभक्तांच्या प्रशंसनीय कार्यामुळे भारतमातेचे डोके सदैव अभिमानास्पद आहे असे डॉ सुषमा शहरावत यांनी म्हणलं आहे.
देशभरात उल्लेखनीय कार्य करणारे परंतु पुरस्कारापासून वंचित असल्याला व्यक्तिमत्वाचा शोध घेऊन त्यांना व्यासापीठ देण्याचे काम हि संस्था करत आहे आणि पुढेही करत राहणार असेही डॉ सुषमा म्हणाल्या .ओयासिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन दिल्ली सातत्याने प्रेरणादायी वाटचाल करत आहे या कार्यात अध्यक्षा डॉ सुषमा यांचे मोलाचे योगदान आहे