
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे :
पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत रू.१५ हजार आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रू. २५ हजार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान अर्थसहाय्य देणेची योजना आहे.
या योजनेअंतर्गत
सन २०२२ (फेब्रुवारी-मार्च) या शैक्षणिक वर्षात इ. १० वी / इ. १२ वी मध्ये कमीत कमी ८०% गुण मिळणे आवश्यक आहे. तथापि पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी / रात्रशाळेतील विद्यार्थी/ मागासवर्गीय विद्यार्थी यांनी किमान ७०% आणि दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना/ कचरावेचक विद्यार्थ्यांना ४०% गुण आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी https:/dbt.pmc.gov.in येथे संपर्क साधावा असे पुणे मनपाने कळविले आहे.