
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी-प्रा अंगद कांबळे
म्हसळा – २२ आॅगस्ट २०२२ रोजी कन्या शाळा म्हसळा येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ( शिवाजीराव पाटील गट ) शाखा म्हसळा यांची सभा उत्साहात संपन्न झाली.
या सभेसाठी नवनिर्वाचित म्हसळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड , मांदाटणे ग्रामपंचायत चे सरपंच चंद्रकांत पवार,वरवटणे केंद्राचे केंद्र प्रमुख अरविंद मोरे सर, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तथा पाष्टी केंद्राचे केंद्र प्रमुख नरेश सावंत, म्हसळा केंद्राचे केंद्र प्रमुख राहुल नाईक सर, बशीर उल्डे सर, काझी सर, दिपक पाटील सर, दिलिप शिंदे सर संघटनेचे सचिव बाळासाहेब बिचुकले सर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम दिपप्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवर यांचा शाळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष सावंत सर यांनी केले, नुकत्याच पार पडलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लिमिटेड पेण सोसायटीच्या माध्यमातून निवडून आलेले नवनियुक्त संचालक अरविंद मोरे सर आणि सुमित्रा खेडेकर मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
म्हसळा पंचायत समिती शिक्षण विभागाचे कार्यतत्पर गटशिक्षणाधिकारी मा. श्री. संतोष दौंड सर यांनी उपस्थित शिक्षकांना संबोधित करताना सांगितले की, आपल्या म्हसळा तालुक्यातील शिक्षक संघटना अतिशय उल्लेखनीय कार्य करत आहेत. संघटना अनेक असल्या तरी संघटनेचे कार्य नेहमी सर्वांना सोबत घेऊन करत आहेत हे विशेष पहायला मिळाले, शाळेला,शिक्षकांना दिलेले उद्दिष्ट हे परिपूर्ण पणे पार पाडण्याचा प्रयत्न करा अशावेळी शिक्षण समूहाची शान नक्कीच वाढेल. आपला तालुका शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे त्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत असे मनोगतात सांगितले, म्हसळा तालुक्यातील मांदाटणे ग्रामपंचायतीने उल्लेखनीय उपक्रम हाती घेतल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रोत्साहन दिल्याबद्दल सरपंच चंद्रकांत पवार यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन शिक्षक भारती व प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने (शिवाजीराव पाटील गट) सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, संघटनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
उपस्थित शिक्षकांनी आपले विचार व मनोगत व्यक्त केले.
या सहविचार सभेचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष नरेश सावंत सर यांनी केले सुत्रसंचलन संघटनेचे सचिव बाळासाहेब बिचुकले सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन संघटनेचे कार्याध्यक्ष महेंद्र गायकवाड सर यांनी केले