
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, झेब्रा क्रॉसिंगचा बट्ट्याबोळ आणि मागील सहा महिन्यांपासून कोलमडलेली सिग्नल यंत्रणा यामुळे शहरात सर्वत्र, विशेषतः राष्ट्रीय महामार्गावर निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमालीची जीवघेणी ठरली जात आहे. शिवाय याप्रकरणी पोलीस यंत्रणेकडून वारंवार तोंडी व लेखी पत्र व्यवहार करुनही महापालिका प्रशासनाकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही किंवा आवश्यक अशी कोणती सुधारणाही केली जात नाही, अशी खंत परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांनी व्यक्त केली.
आ. पाटील यांनी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन शासनाचे परभणीच्या वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधले. त्यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, शहरांतील मुख्य चौक आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ घ्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सिग्नल यंत्रणेच्या केबल्स तुटल्या गेल्या आहेत. सिग्नल यंत्रणा अद्ययावत केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आवश्यक अशा निविदा प्रणालीचे काम प्रगती पथावर असून उर्वरित प्रलंबित सर्व कामे लवकरच पूर्णत्वास नेली जातील असेही ते म्हणाले.
राज्य व देशपातळीवर सर्वत्र कमालीची सुधारणा झाली आहे. राज्यासह संपूर्ण देश विकासात्मक प्रगती पथावर आहे. असं असलं तरी निजामकालीन जिल्हा परभणी व शहर हे अजूनही विकासापासून कोसो दूर आहे, असं म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही.
“जगात जर्मनी अन् देशात परभणी” अशी बॉलीवूड क्षेत्रात ख्याती मिळवलेल्या या शहराचा व जिल्ह्याचा खरोखरच सर्वांगीण विकास साधला जाईल का नाही ? साधला जाईल तर तो कसा आणि कधी, हा खरा सवाल आहे. नियोजनशून्य प्रणाली मध्ये जखडलेल्या शहराचा आधुनिक पध्दतीने विकास साधता यावा यासाठी राजकीय नेते व पण
प्रशासनाचीही अनास्था असल्याचे दिसून येत आहे. किमानपक्षी सभोवतालच्या जिल्हा स्थानांचे नागरी विकासात्मक चित्र, औद्योगिक वसाहती व वंचित असलेले शैक्षणिक क्षेत्र किती प्रगती पथावर गेले आहेत, यांचा तरी अभ्यास करणे आवश्यक आहे.
मलाई आणि मलिदा तर सगळेच खातात असा बोलबाला आहे तथापि विकासाचा वारु दवडतांना स्थानिक नेत्यांनी राजकीय अहंकाराचे थोडे बाजूला सारले आणि खांद्याला खांदा लावून सर्वांगीण विकासासाठी एकात्मता साधली तर कोण किती खातोय यापेक्षा केलेले विकासाचे काम कोणी केले, अशी विचारणा जनतेतून केली जाते आवश्यक आहे. पैसा मतदारांना वाटण्यापेक्षा विकासाला चालना देण्यासाठी वापरला गेला नि विकले जाणारे मतदार सुधारता यावेत यासाठी विकासाचे घोडे अधिकाधिक पळवल्यास कधीकाळी पैशाचा हव्यास करणारा तोच मतदार चांगले काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या साथीने कार्यरत राहिला जाईल यासाठीचे प्रयत्न सर्वच स्तरातून राहिले तर नक्कीच आपले शहर, गाव सुधारले जाईल यात शंकाच नाही.