
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
———————————————–
लोहा: दि.२५ ऑगस्ट
लोहा शहरातील नारायणा इंटरनॅशनल स्कूल येथे २४ आॅगस्ट रोजी शिक्षण विभाग, पंचायत समिती लोहा व नारायणा इंटरनॅशनल स्कूल लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने ४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटातून के प्रा शा सुनेगावची विद्यार्थिनी कु. आकांक्षा बजरंग जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक आकाश बळीराम पांचाळ, किसान विद्यालय उमरा तर ग्लोबल इंग्लिश स्कूल लोहाची विद्यार्थिनी मनस्वी अंबर फुलसे हिने तृतीय क्रमांक मिळविला.माध्यमिक गटातून सह्याद्री माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. गौरी धनंजय कोटलवार प्रथम क्रमांकावर, नारायणा इंटरनॅशनल स्कूल, लोहा येथील कु. शुभांगी गंगाधर डोम द्वितीय व श्री संत गाडगेमहाराज माध्यमिक विद्यालय, लोहाचा विद्यार्थी आनंद कोंडिबा पवार याने तृतीय क्रमांक पटकावला.प्राथमिक शिक्षक गटातून सह्याद्री इंग्लिश स्कूल, लोहाचे ओमकिरण सिरगे, माध्यमिक शिक्षक गटातून श्रद्धा पाटील (सह्याद्री माध्यमिक विद्यालय, पारडी) व प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गटातून श्री शिवाजी विद्यालय सोनखेडचे प्रयोगशाळा सहाय्यक किरण मधुकर लोंढे यांच्या साहित्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.
तालुकास्तरीय विज्ञान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के तर उद्घाटक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेडचे प्राचार्य डाॅ. रवींद्र अंबेकर, प्रमुख पाहुणे म्हणून लोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे, लोहा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, लोहा या संस्थेचे अध्यक्ष नारायणराव मुंडे, सचिव नामदेवराव केंद्रे, नारायणा इंटरनॅशनल स्कूल, लोहाचे प्राचार्य शिवाजीराव केंद्रे आदींची उपस्थिती होती.
विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगांचे परीक्षक म्हणून प्राथमिक गटासाठी कंधार तालुक्यातील शिक्षक रमेश राठोड, भगवान चिवडे, एस एम गणाचार्य तर माध्यमिक गटासाठी आनंद सुरसे (श्री शिवाजी हायस्कूल, माणिकराव, नांदेड), अनिल सुगावकर राणी लक्ष्मीबाई विद्यालय, नांदेड), मुख्याध्यापक रवींद्र जिल्हावार (श्री बसवेश्वर विद्यालय, कामठा बु ता. अर्धापूर), रवींद्र फुले (महात्मा फुले विद्यालय, विजयनगर नांदेड) यांनी काम पाहिले.तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक प्राचार्य डाॅ.रवींद्र अंबेकर यांनी मनोगतात लोहा पंचायत समितीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दर्जेदार व भव्य स्वरूपात आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. अशा विज्ञान प्रदर्शनातून ग्रामीण भागातील विद्यार्थांना संशोधनाची प्रेरणा मिळते ,असे उद्गार त्यांनी काढले.या विज्ञान प्रदर्शनास नांदेड जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर राठोड सुधीर गुट्टे यांनी भेट देऊन विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांशी संवाद साधला. लोहा तालुक्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी समारोपीय कार्यक्रमात उच्च प्राथमिक, माध्यमिक गटातील विजेत्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी सतीश व्यवहारे, आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे तर सूत्र संचालन परशुराम कौंसल्ये व रमेश पवार यांनी केले.
नारायणा इंटरनॅशनल स्कूल, लोहा यांच्या वतीने विज्ञान प्रदर्शनात सहभागी सर्व विद्यार्थाना रायटिंग पॅडचे वाटप करण्यात आले. तसेच प्रदर्शन स्थळी सहभागी विद्यार्थी, शिक्षकांसाठी उत्तम भोजनाची सोय करण्यात आली होती.
विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक व माध्यमिक गटात विद्यार्थ्यांनी एकूण ७८ प्रयोग सादर केले. तर प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांनी एकूण ०९ शैक्षणिक, प्रयोग साहित्य प्रदर्शित केले. सदर विज्ञान प्रदर्शनास लोहा शहर व परिसरातील १३ शाळांतील ४५ शिक्षकांसह ७९१ विद्यार्थ्यांनी भेट दिली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विज्ञान प्रदर्शन विभाग प्रमुख बालाजी कातुरे, सर्व गट साधन केंद्र कर्मचारी, निवासी वसतिगृह कर्मचारी तसेच नारायणा इंटरनॅशनल स्कूल, लोहाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवृंद आदींनी परिश्रम घेतले.