
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या भारत जोडो पदयात्रा नियोजन बैठक शासकीय विश्रामगृह देगलूर येथे पार पडली.सदर पदयात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुकातुन जात असल्याने त्या संदर्भात पुर्वनियोजन आढावा बैठक घेण्यात आली त्या प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मा.मोहन जोशी साहेब,मा.सचिन गुंजाळ साहेब,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार अमर भाऊ राजूरकर,नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,आमदार जितेश भाऊ अंतापुरकर,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,प्रदेश सचिव डॉ. श्रावण रेपणवाड,प्रदेश सचिव सुरेंद्र घोडजकर,माजी शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी,माजी समाज कल्याण सभापती रामराव नाईक, माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर,काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष शंकरराव कंतेवार, बिलोली तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील, प्रशांत पाटील,जनार्दन बिरादार, माजी जि.प.सदस्य दिलीप बंदखडके बालाजी पा.थडके, बसवराज पाटील वन्नाळीकर , विष्णू पाटील,सादिक भाई, व्यंकटेश पाटील वझरगेकर, पत्रकार माणिक सुर्यवंशी, मरखेलकर रुपेश पाटील आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते