दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
कामळज तालुका मुदखेड 02.09.2022 ते दिनांक 09.09.2022 या कालावधीमध्ये परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामी अष्ट शताब्दी जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ने गुजरात राज्यातील भडोच येथे अवतार स्विकार करून 11 व्या शतकामध्ये महाराष्ट्रात आले. आणि समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले. त्या काळात पुरुष प्रधान भक्ती होती. स्त्रियांना व शूद्रांना धर्म आचरण करण्याचा मुळीच अधिकार नव्हता. तत्कालीन धर्म मार्तंडाचे विचार झुगारून लाऊन स्त्री व पुरुष समानतेचा अधिकार प्रस्थापित केला. ईतकेच नव्हे तर अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रप्रेम, विश्वबंधुत्व, सहिष्णुता, शालीनता आणि नम्रता आदी गुणाचा प्रभाव आपल्या प्रबोधना द्वारे प्रगटीकरण करून सुमारे 54 वर्षे महाराष्ट्रात अवतार कार्य केले. त्या काळात 11 व्या शतकात महानुभाव पंथाची स्थापना करून मराठी साहित्याला पहिला ग्रंथ लीळाचारित्र्य ग्रंथाची निर्मिती केली.
अशा ह्या पूर्ण परब्रम्ह अवताराला महाराष्ट्राच्या पावन भूमीत जन्म घेऊन या वर्षी सुमारे 800 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने श्री चक्रधर स्वामी अष्ट शताब्दी महोत्सव कामळज येथे साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महानुभाव पंथाचे सुप्रसिद्ध भागवताचार्य श्री बाभूळगावकर बाबा शास्त्री यांच्या सुमधूर वाणीतून दुपारी 03.00 ते 05.00 वा. संगीत भागवत कथा संपन्न होणार आहे. व रात्रीला 09.00 ते 11.00 वा. महानुभाव पंथातील नामवंत कीर्तनकार यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम दररोज संपन्न होणार आहे. दिनांक 08.09.2022 रोजी दुपारी तीन वाजता कुलवंदना चि गावातून रथ यात्रा व साधू संताची भव्य शोभा यात्रा निघणार आहे. तसेच दिनांक 09.09.2022 रोजी प.पु. प. म.श्री लासूरकर बाबा जिल्हा जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली धर्म सभा संपन्न होणार आहे. या धर्म सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आचार्य श्री पैठणकर बाबा श्री क्षेत्र रुद्धपूर, आचार्य श्री दुतोंडे बाबा कुरुंदकर जिल्हा हिंगोली,
आचार्य श्री रुद्धपूरकर बाबा अजिंठा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार श्री अशोकराव चव्हाण साहेब व नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रामुख्याने उपस्थित लाभणार आहे. या शुभ प्रसंगी हेलिकॉप्टरने गावाचे कुलवंदन श्री दत्तात्रय प्रभूच्या मंदिर कलशा वर व उपस्थित साधू संतावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दुपारी 1.00 वाजता लगेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या प्रसंगी नांदेड जिल्ह्य़ातील सर्व साधू संत, आचार्य गण, वासनिक, भिक्षुक, तपस्वी माता व पाहुणे मंडळी यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनन्ती आयोजक श्री गोविंदराव व्यंकोबा खानसोळे, दत्ताराम भिमराव पाटील खानसोळे, दत्ताराम बायजी खानसोळे, रामचंद्र बाबाराव खानसोळे, संभाजी पाटील येडे, बालाजी तानाजी खानसोळे माधव संभाजी खानसोळे, मोतीराम मारोती खानसोळे, शिवाजी मारोती खानसोळे, चक्रधर बालाजी खानसोळे, आनंद दिगंबर खानसोळे, अंताजी गोविंदराव पडोळे व समस्त गावकरी मंडळी कामळज वतीने विनंती करण्यात येत आहे.
