दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
—————————————-
नांदेड ः अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना लागू करावी, राज्यातील निकषपात्र विनाअनुदान शाळा, वर्ग आणि तुकड्यांनाप्रचलित अनुदान सुत्रा नुसार 100%अनुदान देवून शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांची वेठबिगारी थांबवावी या व इतर मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले . यावेळी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा महात्मा फुले पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत मोर्चा नेण्यात आले.या मोर्चात जवळपास तीन हजार शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.सदर मोर्चास मुख्याद्यापक संघाचे संजय शिपरकर,विनाअनुदानीत शिक्षक संघाचे प्रा.आनंद कर्णे,जूनी पैन्शन योजनेचे करकिले गोविंद ,जुक्टाचे एन.डी.गाडवे,औरंगाबादहून आलेले मुक्टा संघटनेचे मो.तांबोळी , महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना राज्य कोषाध्यक्षः वसंत जारीकोटे,माध्यमिक संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष कल्याण सर,लातूर जिल्हा सिरसाट संजीव ,राज्य मध्यवर्ती संघटनेचे लक्ष्मण नारमवार, ना.रा.जाधव ,इत्यादी संघटनानी पाठिंबा दिला.यावेळी मागण्याचे निवेदन संघटनेचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव आणि विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम जिल्हाध्यक्ष व्ही.आर.चिलवरवार ,केंद्रीय का.सदस्य जी.पी.कौसल्ये ,ई.डी.पाटोदेकर ,सचिव आर.के.वाकोडे ,शहराध्यक्ष डी.बी.नाईक ,सचिव बी.एस टिमकीकर ,कोषाध्यक्षः आर.डी.पाटील ,जिल्हाउपाध्यक्ष बडूरे जी.पी.मठपती एम.एस.हाळदे माणिक ,सहसचिव आर.पी.वाघमारे ,रायकोड नागोराव उत्तम लाठकर ,वडवळे एच,बी.भुताळे विनोद ,संभाजी बुडे,प्रसिद्धी प्रमुख शिवानंद स्वामी,कालिंदा वायगावकर,स्वामी मॕडम आदींनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविले आले आहे. यावेळी जिल्हा व तालुक्यातील सर्व पदाधिकारी शिक्षक-शिक्षिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
