
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – तालुक्यातील धावरी येथे शिवमुद्रा जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिवमुद्रा मिञ परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नेञ तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सतत उत्कृष्ट कामगिरी करणारे व समाज हिताचे अनेक उपक्रम राबवणारे शिवमुद्रा जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदाजी पा इंगळे यांनी व शिवमुद्रा मिञपरीवारांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवमुद्रा जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भव्य नेञ तपासणी शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिर ठेवून सामाजिक बांधिलकी जपली असुन डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे. डोळ्यांमुळे माणुस ईश्वराने बनवलेली सजीवसृष्टी पाहु शकतो डोळे नसले तर व्यक्ती जगाचे सौंदर्य पाहू शकत नाहीत, सौंदर्याने भरलेली सृष्टी पण मानवाला पाहता येत नाही. या नेञ तपासणी शिबीरात शालेय विद्यार्थी शेतकरी शेतमजूर महिला वर्ग आदिंनी लाभ घेतला.
डॉ मोरे यांनी अत्याधुनिक मशीनद्वारे ग्रामस्थांची नेत्र तपासणी केली.पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला. या शिबिरात 200 लोकांची नेञतपासणी करण्यात आली व 25 लोकांचे मोफत मोतिबिंदू ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे डॉ मोरे व शिवमुद्राचे अध्यक्ष नंदाजी पा इंगळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी गाववचे सरपंच उपसरपंच व गावातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले
या मोफत नेत्र तपासणी शिबीरास सरपंच माणिक पा वाकडे , उपसरपंच अशोक गिते , तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रहार वाकडे , चेअरमन शंकर पा काळे , शालेय समिती अध्यक्ष राजु पा वाकडे , रूक्माजी पवार व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.