दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
दिनांक 30/8/2022रोजी हरतालिका व्रत आहे. वर्षभरापासून उपावास व्रत करून भगवान शंकर यांची मनोभावे पूजा करून उपवास करण्याची परंपरा प्रथा भारतीय स्त्रियांच्या अनन्य अशा श्रद्धेचा भाग आहे. आपल्याला सहकार्याला , जीवनाच्या आधारस्तंभाला आपल्या प्राण प्रिय असा सखा जोडीदाराला उंदड आयुष्य लाभावे किंवा आपल्या जीवनात आपल्याला यथा योग्य जोडीदार प्राप्त व्हावा म्हणून युगायुगा पासुन हरतालिका व्रत करण्याची प्रथा परंपरा हि आपल्या धर्म शास्त्रानुसार पुरातन आहे.परंतु विद्यमान युगातील भारतीय स्त्री साठी हरतालिका व्रत हे महान अशा पर्वणी पेक्षा कमी नाही. आपल्या प्रिय व्यक्ती ला प्राप्त करण्यासाठी तसेच प्रिय व्यक्तिच्या दिर्घ आयुष्य साठी किती कठोर आणि घनघोर तप साधना ,करू शकते ,याचा वस्तुपाठ हा माता देवी सतीने घालून दिला आणि तोच वस्तुपाठ विद्यमान युगातील सर्व साधारण स्त्रि च्या मनातील श्रद्धा भाव प्रकाट होण्याचं निमित्त म्हणजे अलौकिक व्रत म्हणजे हरतालिका व्रत होय.जगातील सगळ्यात पुरातन आणि सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून आपल्या हिंदू संस्कृती कडे पाहिलं जातं. अगदी सतयुग ,ञेतायुग, द्वापारयुग व सध्याच्या विद्यमान कालयुग या चारही युगात चार वेद अठरा पुराणे हि आपल्या संस्कृती नुसार सर्वश्रेष्ठ मानली आहेत . अगदी सतयुगातील महाराज मनु अणि त्यांची धर्म पत्नी देवी सतरूपा असो किंवा सृष्टीच्या रचनेतील वेगवेगळ्या देवी दैवतांनी घेतलेला मानवी अवतार असो सृष्टीच्या उत्पत्ती पासुन ते रक्षण ,पालन ,पोषण , आणि ,संहार या मध्ये वेगवेगळ्या दैवतांचा सहभाग आहे . हे नाकरण किंवा स्वीकारणं हे विज्ञान युगात कठिण असलं तरी आजच्या स्त्रिया ज्या पद्धतीने संस्कार व संस्कृती भाव ठेवून व्रत करत आहेत ते पाहता त्यांची अफाट श्रद्धा यामध्ये प्रकाट होते.हे नाकारता येणार नाही. मागिल काही युगात तर अनेक दैवी दैवतांनी मानव अवतार धारण करून सृष्टी वर शासन करताना सर्व सामान्य माणसा सारख विविध अडचणी संकटाला तोंड देत जीवन व्यतित केले.आणि येणार्या काळातील मानवासाठी अनेक असे आदर्श निर्माण केले . आणि त्या आदर्श मार्गावर मार्गक्रमण करत असताना त्रास होईल अडचण येतिल , संकट येतिल दुःख होईल पण प्रवास यशस्वी होईल अशी शाश्वत हमी आहे. आपल्या संस्कृती नुसार धर्मा प्रति असणारी आतोनात श्रद्धा भाव प्रकट होणार हे हरतालिका व्रत हे पवित्र व लाभकारी व्रत सर्व प्रथम आपल्या धर्माचे दैवत व सृष्टी चे सर्वासरवा भगवान शंकर यांनी देवी पार्वती यांना संगितली आहे .कि देवी पार्वती मागिल जन्मी माता देवी सती होत्या आणि त्यावेळी भगवान शंकर यांच वरण व्हावं म्हणून जे घनघोर तप केले होते . विलक्षण होते . आणि त्या दरम्यान आलेले प्रचंड विघ्न व तरी सुद्धा जिंकला तो सतीचा भक्ती भाव व शरतेशेवटी तपश्चर्या यशस्वी झाली आणि पर्वती रूपाने भगवान शंकराची प्राप्ति झाली . एकंदरीत या सगळ्या बाबी मध्ये सत्य, काय आहे .असत्य काय आहे हे व्यक्तिपरतवे आपल्या आपल्या दृष्टीने व सृष्टीच्या प्रति जशी भावना आहे.तयानुसार मुल्यमापन तिथपर्यंत होऊ शकत . या मध्ये असणारी सुद्धा भावना अलौकिक श्रद्धा हि खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधुन स्त्रियांनचया मनात असणारी आपल्या परम प्रिय व्यक्ती विषयी असणारी सद्भावना प्रकाट होऊन एकतर आपल्या जीवनात प्रिय व्यक्तीच वरण व्हावं व त्याला दिर्घ आयुष्य लाभावे हि मनोकामना पूर्ण होण्यासाठी अगदी कुमारी वयापासून मुली ते अगदी विवाहित स्त्रिया अगदी तहयात हे व्रत करतात .हि किती प्रचंड पराकाष्ठा आहे.आणि हे व्रत काही सहज सोपं नाही.अगदी निर्जळ उपावास करून ईश्वराची आराधना करण हि धर्म शास्त्रानुसार भारतीय स्त्रियांच्या मनात संस्कार व संस्कृती प्रति किती प्रचंड असा अनन्य साधारण श्रद्धा भाव आहे .याच विलक्षण दर्शन घडवणारा हा प्रसंग अगदी स्तुत्य आहे. तो आदरभाव माता सती ते पार्वती ,व माता सिता पांडव पत्नी दौपदी यांच्या पासुन, माता रेणुका ,माता अनुसया यांनी अंखडितपणे निर्माण केलेली हि परंपरा आजपर्यंत अगदी श्रद्धा भावाने चालू आहे. आणि आजच्या युगातील बहुतांश स्त्रिया अगदी प्रचंड अशा भक्तिमय वातावरणात हे व्रत करतात हि सर्वसाधारण बाब नाही तर प्रचंड अशा समर्पणाची भावना ,व आपली अतुट अशी श्रद्धा निष्ठापूर्वक निर्वाहन करण्याची अलौकिक परंपरा कृतीतून पुढे चालण्याचा जो अनोखा संकल्प आहे तो नक्कीच अभिमानास्पद अभिनंदनीय व कौतुकास्पद गौरविण्या सारखा आहे. व भविष्यातील पिढीसाठी आदर्श आहे .
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301
