
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
चालक-मालक मित्र संघटना आणि युवा सामर्थ्यचा अभिनव उपक्रम
जव्हार:-शहरातील नवाजलेल्या श्री गणेशोत्सव मंडळापैकी एक असलेल्या सार्वजनिक चालक-मालक श्री गणेशोत्सव मंडळ,जव्हार आणि युवा सामर्थ्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान अथवा जीवनदान’ या उक्तीप्रमाणे जव्हारच्या चालक-मालक संघटनेच्या गणेशोत्सव मंडळा अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराला युवा सामर्थ्य प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य लाभले.२००६ साली स्थापन झालेल्या चालक-मालक मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे १७ वे वर्ष असून दुर्गम भागात नेहमीच आदिवासी गरीब रुग्णांना रक्ताची कमतरता भासते.एक सामाजिक सलोखा आणि जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालयातच रुग्णांना रक्ताची उपलब्धता व्हावी या उद्देशाने युवा सामर्थ्य आणि चालक-मालक मित्र मंडळ एकत्रित येऊन तालुक्यातील रक्तदात्यांचा शोध घेऊन गरजू रुग्णांना रक्त दानाच्या माध्यमातून जीवनदान देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला.
*रक्तदानाचे महत्त्व*
एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी तसेच अपघात,अतिरक्तस्राव,प्रसवकाळ आणि रुग्णांच्या शस्त्रक्रियेच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताची कमतरता असते.त्याचप्रमाणे हिमोफिलिया,थैलेसमिया यासारख्या विकारांनी पीडित असणाऱ्या रुग्णांमध्ये वारंवार रक्तची आवश्यकता असते.अशा परिस्थितीत जव्हार सारख्या ग्रामीण भागातील रुग्णांना रक्तदानाच्या माध्यमातून नवीन जीवनदान व त्यांना रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालक-मालक मित्र संघटना आणि युवा सामर्थ्य प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केले.
यावेळी चालक-मालक मंडळाचे अध्यक्ष रवी पोटिंदा,उपाध्यक्ष अमित आयरे,तात्या जाधव,सचिव गणेश पुजारी,सहसचिव बबन जाधव,रुपेश घाग,खजिनदार नितीन कदम,रवी चव्हाण,कार्याध्यक्ष अनिल शिरसाट,युवा सामर्थ्यचे संस्थापक-अध्यक्ष मुकेश वातास,सदस्य प्रशांत वाघमारे,काशिराम जंगली,महेश बिरारी,भूपेंद्र घाटाळ उपस्थित होते.