
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय कराळे
परभणी : केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पध्दतीने सुरु आहे, याचा आढावा घेण्यासाठी व पहाणीसाठी परभणीत दाखल केंद्रीय पथक मंगळवार, दि. ६ सप्टेंबर २२ पर्यंत ते येथेच थांबणार आहे. पूर्णा, सेलू व जिंतूर तालुक्यातील एकूण १२ ग्रामपंचायतींना भेटी देऊन तेथे सुरु असलेल्या योजनांचा लाभ ज्यांनी ज्यांनी घेतला आहे, त्यांच्याशी हे पथक प्रत्यक्ष संवाद साधणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना याशिवाय अन्य काही केंद्रीय योजना परभणी जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहेत. त्याविषयीचा प्रथम संवाद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांचेशी या पथकाने साधला. प्रत्येक विषयांवर झालेल्या कार्याचा आढावा घेत सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची सविस्तर माहिती रश्मि खांडेकर यांनी या पथकाशी झालेल्या संवादातून दिली. त्यावेळी नरेगाचे डॉ. अरुण ज-हाड, डॉ. संदीप घोणशीकर, राजेन्द्र तुकाबले, जयंत गाढे आदीजन उपस्थित होते.
शुक्रवार, दि. १ ते मंगळवार, दि. ६ सप्टेंबर २२ या दौऱ्यादरम्यानच्या कालावधीत हे पथक पूर्णा, सेलू व जिंतूर या तीन तालुक्यांतील एकूण १२ ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रातील योजनांचा आढावा हे पथक घेणार आहे. तेथे सुरु असलेल्या केंद्र शासनाच्या विविध योजनांविषयी लाभार्थ्यांशी संवाद साधून आतापर्यंतची प्रगती नोंदणी केली जाणार आहे.
अश्विन रावल, ऋषभ जोशी यांचा या पथकात समावेश आहे. पूर्णा तालुक्यातील चुडावा आणि कात्नेश्वर या ग्रा. पं. क्षेत्रातील लाभार्थ्यांनी संवाद साधून प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत सुरु घरकुलांचीै प्रत्यक्ष पाणी केली, आढावा घेण्यात आला तर नरेगा अंतर्गतच्या सार्वजनिक व वैयक्तिक विहिरींचीै आणि रस्ते पहाणी केली. त्यावेळी सुनीता वानखेडे, राजेश कापूरे. व श्रीकृष्ण वसेकर आदींची उपस्थिती होती.