ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी,विकी जाधव
ठाणे, दि. 23 मार्च : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात २ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोकण विभागातील अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, एम.टी.एन.एल. इमारत, चरई, ठाणे येथे कार्यरत असलेल्या सौ. मिनाक्षी नारायण उन्हाळे (वय ४६), उपसंचालक (संशोधन) वर्ग-१ यांनी तक्रारदाराच्या पत्नी व मुलीच्या जात प्रमाणपत्र पडताळणी फाईल मंजूर करण्यासाठी २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड-अलिबाग यांनी पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार २३ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.५० वाजण्याच्या सुमारास ठाणे येथील कार्यालयात तक्रारदाराकडून २.५० लाख रुपये स्वीकारताना आरोपी अधिकाऱ्यास रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

