ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी,विकी जाधव
भिवंडी:सह्याद्री प्रबोधन संस्था, सह्याद्री पतसंस्था व लायन्स क्लब भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय आश्रमशाळा चिंबीपाडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले.
वरील सर्व संस्थांच्या समन्वयाने भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी शासकीय आश्रमशाळा चिंबीपाडा येथे महावीर जैन हॉस्पिटल ठाणे व डॉ.अरूण पाटील यांच्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे इयत्ता पहिली ते बारावी तील सुमारे ६०० विद्यार्थी , पालक,शिक्षक व परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरात उत्स्फूर्तपणे बालरूग्ण, हृदयरोग, मधुमेह,महिला रोग तज्ञ,दंतचिकित्सक इ.अनेक तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सहभागी होऊन सामाजिक सेवेच्या बांधिलकीचे दर्शन घडविले.तसेच अनेक विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सल्ला देण्यात आला आहे व त्यासाठीचे मदत देण्याची व्यवस्था केली आहे.
या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरास भरघोस प्रतिसाद प्रतिसाद लाभला असून परिसरातील नागरिक, संरपंच, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी या सर्वांनी शिबीरास भेट देऊन आयोजकांना धन्यवाद दिले व भविष्यात असेच सामाजिक उपक्रम हाती घ्यावे असे आवाहन केले आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय तपासणी शिबिर प्रमुख व सह्याद्री प्रबोधन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रमोद पाटील यांना डॉक्टर पथकासह सह्याद्री पतसंस्थेचे अध्यक्ष श्री विश्वास थळे, उपाध्यक्ष डॉ.अरूण पाटील, कर्मचाऱ्यांसोबत ,लायन्स क्लब चे अध्यक्ष श्री रामचंद्र कदम, सेक्रेटरी श्री विलास भोईर,माजी अध्यक्ष श्री सुधीर देशमुख, सौ.शितल देशमुख यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक व सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचेमौलिक सहकार्य लाभले.

