
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असल्याचे वक्तव्य केलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी खळबळजनक विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे एक-दोन नव्हे तर तब्बल पन्नास गट आहेत, यात माझाही एक वेगळा गट असल्याचं खळबळजनक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी करत मंत्री गुलाबराव पाटील यांना जोरदार टोला लगावला.
एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुक्ताईनगर येथील निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याच पहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ५० आमदारांचे पन्नास गट असल्याच एकनाथ खडसे यावेळी म्हणाले. माझाही वेगळं गट असल्याचेही खडसे म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पक्षांमध्ये एक गट आणि दोन गट नसतात. पक्ष एकच असतो, एक संघाचा असतो मात्र वैचारिक मतभेद असू शकतात. व्यक्तिगत मतभेद असू शकतात मात्र याचा अर्थ पक्षांमध्ये मतभेद असू शकतात असा आरोप करणे चुकीच आहे, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसचा एक गट भाजपचा संपर्क दर्शन अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावर प्रश्न विचारला असता एकनाथ खडसे म्हणाले की मी सुद्धा नाशिकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राजकारणात भेटीगाठी संस्कृती ही असतेच. राज ठाकरेंना सगळेच भेटतात अशोक चव्हाण यांना सगळेच भेटतात. मीही कधीतरी कामानिमित्ताने एकनाथ शिंदे यांना भेटेल , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही विकासकामानिमित्ताने मी भेट घेऊ शकेल. मात्र याचा काही वेगळा अर्थ काढू नये असं मला वाटतं, असे एकनाथ खडसे यांनी सांगितलं.