
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्याचे सुपुत्र असलेले पण सध्या पनवेल येथे चार्टर्ड अकाउंटेंट म्हणून काम करत असलेले विकास अभंग यांच्या पनवेल येथील ऑफिस ला मुंबई हायकोर्टाचे नामांकित ॲड.सोमचंद्र गाडे व ॲड.संगम सावंत यांनी आज सदिच्छा भेट दिली.विकास अभंग यांनी आपल्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल संपूर्ण माहिती सांगितली.आज पनवेल सारख्या प्रगत शहरात काम करताना आलेले अनुभव आणि सर्वांशी असलेला मनमिळाऊ स्वभाव यामुळे त्यांनीं पनवेल शहरात चांगला नावलौकिक मिळवला आहे. यावेळी शालेय शिक्षण, तसेच इतर अनेक विषयांवर महत्वाची चर्चा करण्यात आली.आपल्याकडे आलेल्या मान्यवरांचा सत्कार विकास अभंग यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी दैनिक चालु वार्ता इंदापूर तालुका प्रतिनिधी बापूसाहेब बोराटे, प्रशांत जाधव तसेच चार्टर्ड अकाउंटेंट विकास अभंग यांच्या ऑफिस मधील संपूर्ण सहकारी उपस्थित होते.