
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार जी यांच्या मार्गदर्शनात व युथ शहराध्यक्ष सागर कांमळे यांच्या नेतृत्वात बल्लारपुर नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या 14 शाळांना भेट देऊन, शाळेतील वास्तविक स्थिती ची पडताळणी करण्यासाठी “निरीक्षण मोहिम” राबविण्या करिता, नगरपरिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी विशाल वाघ साहेब यांची भेट घेऊन शाळांचे निरक्षण करण्याबाबत अनुमति घेण्यात आली, दिल्लीच्या शिक्षण मॉडल च्या धर्तीवर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठीचे नियोजन तैयार करण्यासाठी या उपक्रमांतर्गत “निरीक्षण मोहिम” राबविण्यात येईल. या माध्यमातून शाळांमध्ये विद्यार्थी संख्या, त्यांना मिळणारी शैक्षणिक सुविधा, शिस्त व शिक्षणच्या संदर्भातील उपक्रम, विद्यार्थ्यांच्या संदर्भातील विविध रेकॉर्ड्स यांची माहिती घेतली जाणार, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी साहेब यांनी आश्वासन दिले कि या “निरीक्षण मोहिम” मध्ये मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहयोग मिळेल.
निवेदन देतांना शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योतिताई बाबरे, कोषाध्यक्ष असिफ शेख, युथ शहराध्यक्ष सागर कांमळे, युवा सहसंयोजक गगन सकीनाला, यूथ सचिव रोहित जंगमवार, महिला शहर संयोजिका अलकाताई वेले, महिला संगठन मंत्री सरिताताई गुजर, महिला सह सचिव शीतलताई झाडे, सुधाकर गेडाम जी, पप्पूभैया श्रीवास्तव, सौरभ चौहान, प्रणय नगराळे इत्यादी क्रांतिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.