
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा कंधार च्या वतीने आज दि.११-०९-२०२२ रोजी रविवारी वेळ – ११:०० वाजता स्थळ- कै.वसंतराव नाईक सभागृह (बचत भवन) पंचायत समिती कंधार येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील शिक्षकांचा गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अखिल महाराष्ट्र प्रा.शिक्षक संघ शाखा कंधार च्या वतीने तालुका स्तरीय गुरु गौरव पुरस्काराने सौ शकूना मामडे उत्तरवार सहकुटुंब सन्मानित केले.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंधार लोहा विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री. श्यामसुंदर शिंदे साहेब उपस्थित होते.तसेच यावेळी कंधार तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर , पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, शिक्षक, , शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते.