
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
शहराला पालकमंत्री असते तर प्रशासनावर वचक राहिला असता. शहराला नेतृत्व नसल्याने शहर नेतृत्वा अभावी निराधार झाले असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
पुणे – नालेसफाईची कामं, आंबील ओढा संरक्षण भिंत बांधण्याचे काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन स्वता: आयुक्त व विभागीय आयुक्त यांनी मला दिलं होतं. मात्र, अजूनही ओढा दुरूस्ती अपुरी आहे. शहरात नाले सफाई किती झाली? या संदर्भात आयुक्तांनी कोणतीही माहिती दिली नाही. पालकमंत्री नसले तरी अधिकाऱ्यांनी आमदारांना बोलवून नागरिकांना माहिती द्यायला हवी होती. पाण्याचं निचरा होण्याचं नियोजन झालं नाही.पाऊस सुरू असताना देखील मुंबई मधील सिग्नल सुरू असतात मात्र पुण्यातील सिंग्नल बंद पडले. सिग्नल बंद पडल्यावर संबंधित ठिकाणी तात्काळ वाहतूक पोलिसांना पाठवलं पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा काम करत नव्हती. यासह पुणे शहरात अनाधिकृत बांधकामे असे अनेक प्रश्न आहेत.
रविवारी झालेल्या पावसामुळे शहरात अनेकांच्या घरात,रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या संदर्भात सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत घेऊन त्या बोलत होत्या. डॉ.गोऱ्हे पुढे म्हणाल्या, शहरात भारतीय जनता पक्षाला जनादेश मिळला, मात्र काल पुणेकर संकटात असल्यावर कोणी माजी नगरसेवक मदत करताना दिसले नाहीत. मेट्रोच्या पुलाखाली प्रचंड प्रमाणात पाणी साचत आहे, पाण्यामुळे डेंग्यू ,डास वाढत आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन नियोजनबद्ध करायला हवे. असे डॉ.गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार उपस्थित होते.
मेट्रोच्या उदघाटनाचे श्रेय पाहिजे.मात्र मेट्रोच्या पुलाखाली साठलेल्या पाण्याची जबाबदारी कोणाची? राज्य सरकारचा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या आपत्ती संदर्भात काय कार्यवाही केली ती कळायला हवी. पुणे शहरात नगर विकासाच्या माध्यमातून काही काम झालेलं नाही.