
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
भोकरदन तालुक्यात 5 जनावरांना ‘लंपी स्कीन’ची लागण,पशुपालकांमध्ये धास्ती, पशुसंवर्धन विभाग करणार 5 किलोमीटर परीसरात जनावरांना लसीकरण. पशुपालक, शेतकऱ्यांची चिंता वाढली.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पाच जनावरांना लंपी स्किन आजाराची लागण झाल्याचं समोर आलंय.ही पाचही जनावरं भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक गावातील आहे.या आजाराची लागण झालेल्या जनावरांमध्ये तीन बैल आणि दोन गायींचा समावेश आहे.वरुड येथील काही जनावरांमध्ये लंपी स्कीन आजार सदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर डॉक्टरांनी या जनावरांची तपासणी करून नमुने तपासणीसाठी पाठवले होते.आज या नमुन्यांचा अहवाल आला असून 5 जनावरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे पशुपालकांमध्ये चांगलीच खळबळ उडालीय.
दरम्यान या जनावरांना लंपी स्किन आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी वरुड येथे जाऊन लागण झालेल्या जनावरांवर उपचार सुरु केले आहेत.शिवाय गावच्या 5 किलोमीटर परीसरातील जनावरांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिलीय.