
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे, दि.१३: कन्यादान योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कन्यादान योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होवून विवाह करणाऱ्या मागासवर्गीय जोडप्यांना २० हजार रुपये तर विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ४ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.
कन्यादान योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी सामुहिक सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, यंत्रणांनी सहायक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, स.क्र. १०४/१०५, विश्रांतवाडी रोड, पोलीस स्थानकासमोर, येरवडा, पुणे-०६ ( दू.क्र. ०२०-२९७०६६११) येथे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.