
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड –गोविंद पवार
लोहा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी येथे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. शासनाच्या मोफत गणवेश योजनेद्वारे पांगरी जिल्हा परिषद प्राथमिकता शाळेत विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी पांगरीचे उपसरपंच माधव पा बुद्रुक , शालेय समिती अध्यक्ष भरत पा पवार , सत्कर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष ञ्यंबक पा बुद्रुक , गणेश पा बुद्रुक , रामदास पा बुद्रुक , सौ गोदावरी बुद्रुक , मुख्याध्यापक एम डी बटलवाड , सहशिक्षक गौंड सर सहशिक्षिका श्रीमंगले मॅडम आदिंची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.