
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल तालुका देगलूर येथे दि17 सप्टेंबर 2022 रोजी
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला
श्री बालाजी इंगळे सर खानापूर, संस्था अध्यक्ष यांच्या हस्ते, स्वामी रामानंद तीर्थ व गोविंदभाई श्राफ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर अध्यक्ष साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्काऊट गाईड विभाग,तडखेल
यांच्या द्वारा राष्ट्रीय ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी सर यांच्या मराठवाडा गौरव गीताचे गायन विद्यार्थी व गीतमंच विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आले.
मराठवाडा गौरव गाथा विषयावर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विचार मांडले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये सहभागी व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
श्री सुकाळे सर व श्री बालाजी इंगळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी सर्व विद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.