
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे : १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान देशभरात भाजपा तर्फे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी (दि.१७) कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरूड येथे विविध प्रकराच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
तहसील कार्यालयात कोथरूड येथे विविध दाखले जागेवर उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली आहे. या प्रसंगी पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. विविध प्रकारचे दाखले एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यावेळी पाटील यांनी राष्ट्रपिता महत्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेखही केला.