
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी कवि -सरकार इ़ंगळी
दक्षिण साहित्य सभा आणि बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांचे वतीने विद्याभवन माध्यमिक व उच्चताध्यमिक शिक्षक संघ भवनात प्रसिद्द लेखक कवि सरकार इंगळी यांच्या संपादीत काव्यसरी श्रावणाच्या या प्रातनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. विलास पाटील ,वरिष्ठ प्रकल्प संचालक छ.शाहूमहाराज संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांचे हत्ते आणि डॉ. के.जी जाधव माजी उपप्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वारणानगर,डॉ.प्रा.राजू पोतदार हलकर्णी,. श्रीकांत पाटील यांचे उपस्थित संपन्न झाला. यात कवि भाऊसौ कांबळे ममदापूर,कविअशोक पवार कडेगांव,कवि मधूकर हुजरे उस्मानाबाद,प्रा,डॉ. सुरेश कुराडे गडहिंग्लज, कवियत्रि सौ,प्रतिभा गजरमल सातारा,कवि बी जी कळसे.नांदेड,याच्या कवितेचा समावेश आहे.
तसेच कृषीकेंद्रीत सकारात्मक संदेश देणाराऱ्या ऊसकोंडी या कांदबरीवर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात प्रा. डॉ.शिवाजीराव भुकेले,डॉ. स्मिता पाटील,प्रा.तानाजी बोराडे.यांनी आपले विचार मांडले.
यावेळी लेखक आप्पासाहेब खोत,लेखक दि.बा.पाटील,प्रा.विनोद कांबळे,चंद्रकांत निकाडे अध्यक्ष मराठी बालकुमार सा.स.कोल्हापूर,कार्यवाह परशाम आंबी,सौ,नसिम जमादार,कवि सरकार इ़ंगळी.आणि अनेक साहित्यक,कवि व मान्यावर उपस्थित होते