
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक- ओंकार लव्हेकर
कंधार/नांदेड
पंचायत समिती, लोहा येथे गट विकास अधिकारी शैलेश वाव्हळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शिक्षक संघटनांची बैठक नुकतीच संपन्न झाली . प्रमुख मार्गदर्शक म्हणून गट शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के उपस्थित होते.
या बैठकीत शैक्षणिक गुणवत्ता विकास, तालुका गुरुगौरव पुरस्कार, शालेय विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करून घेणे यासह अनेक विद्यार्थी व शिक्षक हिताच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, बी.पी.गुट्टे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष बाबुराव फसमले, केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बालाजी डफडे, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे, राज्य संघटक अशोक मोरे, शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, शिक्षक संघाचे विभागीय उपाध्यक्ष पी.डी.पोले, प्रहार शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष मल्लिकार्जुन जोडराणे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर,शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके जिल्हा प्रसिध्दीप्रमुख संतोष साखरे, अखिल शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगल सोनकांबळे, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष भांगे, शिक्षक संघाचे जी.एस .उपरवाड, पुरोगामी संघटनेचे विलास नाईक, बसवेश्वर भुरे आदी उपस्थित होते.