
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अहमदपूर शहरात नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एन जी नाईक डान्स अँड फिटनेस स्टुडिओ च्या वतीने गरबा -दांडिया महोत्सव दिनांक 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत संस्कृती मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या गरबा दांडिया च्या महोत्सवाचे आयोजन नितीन आङे यांनी केले होते.
या गरबा दांडिया महोत्सवास अहमदपूर शहरातील महिला व युवतींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने महिला व युवतींनीसहभाग नोंदवला. या पाच दिवसीय दांङीया महोत्सवात ज्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केलं अशा महिलांना व युवतींना आयोजकांच्या वतीने पैठणी स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मंचावर पंचायत समितीच्या मा.सभापती आयोध्याताई केंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई तरङे किलबील नॅशनल स्कूल च्या संचालिका सरोजा भोसले अॅङ सुवर्णा महाजन अनूसया केंद्रे रेखा सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुमेधा गुट्टे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या गरबा दांडिया महोत्सवासाठी प्रशिक्षक म्हणून राहुल मगर अविनाश मगर हे लातूर येथून उपस्थित होते.
हा दांङीया महोत्सव यशस्वी करण्यासाठी नितीन नाईक राज आङे शिवाजीराव सूर्यवंशी चंद्रशेखर भालेराव ज्ञानोबा भोसले, शिला घाटोळ, सुप्रीयाताई भालेराव
कोमल पाटील, रेखा सुर्यवंशी,शिवानी कदम,गणेश कोदळे, यांच्यासह यांनी पुढाकार घेतला