
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
शिवसेनेतील बंडखोरीनंतर केवळ महाविकासआघाडी सरकारच कोसळलं नाही, तर अगदी शिवसेना कोणाची हाही प्रश्न उपस्थित झाला. यावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर सुनावणी सुरू असतानाच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली.
या निर्णयाचा इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे शिवसैनिकांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला.यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख सोमनाथ शेंडे, विभाग प्रमुख रणजीत बारवकर, माजी तालुकाप्रमुख ॲड. नितीन कदम, माजी उपतालुकाप्रमुख बबन खराडे, शिवसैनिक संजय भोंग,अमोल जाधव तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.