
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम :- शहरात स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली.पंडित दीनदयाळ उपाध्याय ( जन्म : मथुरा , २५ सप्टेंबर इ.स. १ ९९ ६ ; ११ फेब्रुवारी इ.स. १ ९ ६८ ) हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते .डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता .भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.दीनदयाळ उपाध्याय १ ९ ३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १ ९ ४२ मध्ये प्रचारक झाले.साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता.शास्त्रे , धर्मग्रंथ , आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘ एकात्ममानववाद ‘ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.शहरात स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी भाजपाचे नेते बाळासाहेब क्षीरसागर , तालुकाध्यक्ष महादेव वडेकर ,सरचिटणीस संतोष सुपेकर, माजी नगरसेवक रोहन जाधव ,शहराध्यक्ष शंकर खामकर,शहर सरचिटणीस,हेमंत देशमुख , श्रीपाद देशमुख ,बाबासाहेब वीर ,प्रदिप साठे,चंद्रकांत गवळी , अॅड संजय शाळू ,संतोष आवताडे , प्रेम महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .