
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे काल आपल्या कुटुंबासह अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे देवनाथ मठामध्ये जितेंद्रनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी आले असता त्याठिकाणी अंजनगाव सुर्जी येथील काही शिवसैनिकांच्या वतीने आमदार संतोष बांगर यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करत वाहनांवर हल्ला चढविला.त्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अंजनगाव सुर्जी येथे देवनाथ मठासमोर एकत्र येऊन नारेबाजी देत गोंधळ घातला.आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली होती.अंजनगाव सुर्जी पोलीसांनी सदर घटनेतील पंधरा ते वीस शिवसैनिकांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलेला होता.त्या घटनेतील ११ शिवसैनिकांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते.त्यानंतर मुख्य आरोपी यांनी दुपारी एक वाजताच्या दरम्यान घटनेतील ९ शिवसैनिकांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले आहे.यामध्ये पोलीसांनी १५ शिवसैनिकांना आरोपी केले असून ९ आरोपींना अटक करून त्यांच्यावर ३५३,४२७,१३५,१४३,१४७,१४९,३४१ महाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यांतर्गत विवीध कलमान्वये गुन्हे दाखल करुन सर्व आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सचिद्र शिंदे यांनी दिली.
या कारवाई दरम्यान पोलीस स्टेशन येथे शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी,जिल्हाप्रमुख सुनील खराटे,युवासेना जिल्हा प्रमुख पराग गुडदे तसेच जिल्हा व तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.