
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
भंडारा. भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी मागील महिन्यापूर्वीच भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार हाती घेतात िल्ह्यांतील सर्व पोलीस ठाण्यांच्या सर्व प्रभारी अधिकार्यांना अवैध व्यवसाय करणाऱ्या माफीयांवर धडक कारवाई करण्यांचे आदेश जारी केले असून. तसेच स्वता या कारवाईत सहभागी होऊन भंडारा जिल्ह्यांमध्ये सध्या अवैध व्यवसाय करणाऱ्या माफीवाल्यांचे चांगलेच धाबे धनंजय असून. यात सिहोरा व परिसरांतील महिलांसाठी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी हे महिलांसाठी देवदूत ठरले असल्यांची प्रतिक्रिया महिलांकडून उमटत आहे. नुकताच केलेल्या धाडसूत्रांच्या आयोजनांत २२ पुरुष व १० महिला यांच्यावर अवैध दारु विक्री प्रकरणात कारवाई केल्यांने एसपी लोहित मतांनी अभिनंदनांस पात्र ठरले. मतांनी यांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणाऱ्या व दारूच्या आहारी गेलेल्या मद्यपी व गुंड प्रवृत्तीवर चांगलाच वचक बसला. दारुमुळे महिलांच्या कपाळाचे कुंकू मिटल्या गेले आहेत महिलांचे मंगळ,सूत्र शेती व घरची भांडी विकणाऱ्या मद्यपीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत दारुच्या आहारी जावुन अनेकांनी मृत्यूला आमंत्रण दिले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांच्या कारवाईचे सर्वत्र चांगलेच कौतुक व स्वागत होत आहे.