
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
ज्ञानदीप विश्व वारकरी संस्था आयोजित दिंडी ही छोट्या चिमुकल्या वारकऱ्यांस दिंडीत सहभागी करून घेऊन “कुशावाडी ते बासर” पायी वारी जात आहेत. या छोट्या वारकऱ्यांचं कौतुक करावं तेवढे कमीच आहे. कारण आजघडीला वारकरी संप्रदाय तयार करणे भरपूर महत्त्वाची कामगिरी आहे. आजच्या डिजिटल युगात नवीन पिढीला चालना देणारे हे चिमुकले वारकरी मंडळी भक्ती संप्रदायाचे कार्य उर्जा स्त्रोत आहेत. त्यांच्या माध्यमातून भक्तीचे व समाजसेवेचे काम पुढे चालेल व ते व्यापक होईल. हे विशेष कार्य ज्ञानदीप विश्व वारकरी संस्था चालक संतोष महाराज कुशावाडीकर, मृदंगाचार्य बालाजीराव महाराज कदम, ज्ञानेश्वर महाराज कोटेकलूरकर, दिंडी संस्थापक उमाकांत पाटील व ज्ञानेश्वर पाटील वन्नाळीकर, अशोक महाराज हिप्परगेकर, आनंदा सज्जन वन्नाळीकर आदी मंडळी करत आहेत. आज वझरगा येथील सर्व गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी विठ्ठल निवृत्ती सुर्यवंशी यांनी या बाल वारकऱ्यांच्या फराळांची अतिशय उत्तमपणे सोय केली तर गोविंदराव जालने यांनी प्रसाद म्हणून पतंजलीचे बिस्कीट पुडे दिले. यावेळी माधव कोकणे, दत्ता बाबळे, किरण जालने, बालाजी टाकळे, मनोहर कोकणे, बालाजी कोकणे, परमेश्वर सूर्यवंशी आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.