
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
पुणे. संत साहित्यांचे आणि लोकवाड्यांचे गाढ अभ्यासू ज्येष्ठ भारुडकार डॉ. रामचंद्र आनंत देखणे (वय ६६) यांनी पुण्यात सोमवारी सकाळी हृदयविकारांच्या तीव्र झटक्यांने अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चांत पत्नी,मुलगा ,मुलगी असा परिवार होता. घटस्थापनेमुळे डॉ. देखणे हे शनिवार पेठेतील घरीच होते. सायंकाळी सातच्या सुमारांस त्यांना हृदयविकारांचा झटका आला कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयांत दाखल केले असता मात्र उपचारांपूर्वीच त्यांनी अखेरचा श्वांस घेतला होता. डॉ.देखणे यांचा फिटनेस चांगला होता. त्यांच्या पार्थिंवावर मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यांत आले. चार दिवसांपूर्वी ते गणेश कला क्रीडा मध्ये नवचैतन्य हास्ययोग परिवारांच्या कार्यक्रमांला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयांत जनसंपर्क अधिकारी म्हणूनही आपला चांगला ठसा उमटवला होता. ३५ वर्षाच्या नोकरीनंतर ते ३० एप्रिल १४ रोजी सेवानिवृत्त झाले. डॉ. देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायांची परंपरा होती. वडिलांच्या कीर्तनांत ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे राहत आणि खड्या आवाजात अभंगातील चरणे म्हणत त्यामुळे कीर्तन,प्रवचन भजन आणि भारुड या कलागुणांमुळे त्यांचा राज्यांतील पत्रकारांशी चांगलाच परिचय होता. त्यांच्या जाण्यांमुळे धार्मिक सामाजिक आणि संस्कृती सृष्टीवर शोककळा पसरली.